पुणे : विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारचालकाने दुचाकीस्वाराला गजाने बेदम मारहाण केल्याची घटना गणेश पेठेत शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी मोटारचालकासह साथीदारांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.रणजित किशोर शिंदे (वय २८, रा. गंज पेठ) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकासह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि त्यांची पत्नी रुग्णालयात गेले होते. शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिंदे दाम्पत्य दुचाकीवरून गणेश पेठेतून निघाले होते. त्यावेळी मोटारचालक विरुद्ध दिशेने आला.

शिंदे दाम्पत्याने मोटारचालकाला तो विरुद्ध दिशेने माेटार चालवित असल्याचे सांगितले. मोटारचालक आणि साथीदारांनी शिंदे दाम्पत्याला शिवीगाळ केली. दुचाकीस्वार रणजित यांना शिवीगाळ करून मोटारचालक आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. मारहाणीत शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलीस हवालदार पारखे तपास करत आहेत.शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून, गेल्या पाच महिन्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ७० हजारांहून जास्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली अहे.

person murder construction worker,
पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
pune steroid injections
पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल
robbers enter in company manager house in Khasala Mhasala stole cash and jewelry
पिंपरी : घटस्फोटाच्या केसमध्ये मदत करीत असल्याच्या संशयावरून मोटारीवर दगडफेक
sandeep kshirsagar
“वाल्मिक कराडला अटक करा, अन्यथा आंदोलन”, आमदार क्षीरसागर यांचा इशारा
man killed for not repaying borrowed money in alibaug
उसने पैसे दिले नाही म्हणून गळा आवळून एकाची हत्या; अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथील घटना
navi mumbai municipal administration unaware of construction developer of building in koparkhairane
खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Story img Loader