पुणे : ज्यांच्या पूर्वजांनी देशाची फाळणी केली ते राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. प्रत्यक्षात या यात्रेतून देश तोडण्याची भाषा केली जाते. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केली जातात. सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास करावा अशी टीका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी रविवारी येथे केली.

हेही वाचा >>> भोरजवळ खासगी बसचा टायर फुटून अपघात; घटनेत कोणतीही जीवितहानी नाही; बस प्रवासी जखमी

हेही वाचा >>> पुणे : कोजागरीनिमित्त पुण्यातील उद्याने आज रात्री दहापर्यंत खुली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवेळी  स्वातंत्रवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुळीक बोलत होते. शहर सरचिटणीस गणेश घोष ,राजेश येनपुरे, दत्ता खाडे, जितेंद्र पोळेकर,  प्रमोद कोंढरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : करोना काळात कर्तव्यावर असताना मृत झालेल्यांचे स्मारक

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्षेपार्ह टीका केली आहे. देशातील काँग्रेसचा जनाधार संपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वीर सावरकर यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा भारतीय जनतेने स्वीकार केला आहे. त्यामुळे नैराश्यातून राहुल गांधी बेताल वक्तव्य करीत आहेत. काँग्रेसला देशात अराजकाची स्थिती निर्माण करायची आहे, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : राष्ट्रीय पेयजल योजनेची जिल्ह्यातील २३६ कामे पूर्ण

मुळीक म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत जाणीवपूर्वक वीर सावरकरांना अपमानित करण्याचे काम केले गेले. आम्ही सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो.पण, अंदमान कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले फार थोडे आहेत. वीर सावरकरांनी अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली. राहुल गांधी यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही. आता अशा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागतावेळी  शिवसेना निषेध करणार की, त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेच्या स्वागताला जाणार का असा प्रश्न निर्माण होतो.

Story img Loader