पुणे : धावत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी रात्री घडली. मोटारीतील चालक, तसेच महिला बाहेर पडल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोटार पूर्णपणे जळाली. पुणे-सातारा रस्त्यावरुन मोटार कात्रजकडे निघाली होती. पद्मावती बसथांब्याजवळ मोटारीतून धूर आल्याने चालकाने प्रसंगावधान राखून मोटार बाजूला नेली. मोटारचालक आणि महिला त्वरित बाहेर पडले. मोटारीने पेट घेतला. आग भडकल्याने घबराट उडाली. बघ्यांची गर्दी झाल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. मोटारीत शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता जवान सचिन शिंदे यांनी व्यक्त केली.
सातारा रस्त्यावर धावत्या मोटारीला आग; मोटारचालकासह महिला त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला
मोटारीत शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता जवान सचिन शिंदे यांनी व्यक्त केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-08-2023 at 22:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moving car catches fire on pune satara highway pune print news rbk 25 zws