नारायणगाव : ‘पुणे-नाशिक’ सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास शिरूरचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्पाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्पोक- जीएमआरटी’ येत असल्याने त्यांच्या शास्त्रज्ञांनी त्यावर तोडगा काढावा अन्यथा मार्ग बदलण्याच्या निर्णयाविरोधात लढा उभारावा लागेल, अशी भूमिका डॉ. कोल्हे यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय

‘पुणे-नाशिक या ‘सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आला असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीरे केले आहे. या पार्श्वभूमीवर नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सवा’च्या समारोपावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी मार्ग बदलण्यास विरोध दर्शविला. ‘जीएमआरटी’ प्रकल्पामुळे या भागात उद्योग व्यवसाय, कारखाने उभे राहू शकत नाहीत.

हेही वाचा >>> उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यची अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडीत आणि शेती व्यवसाय केंद्रीत झाली आहे. शेतमाल उत्तर आणि दक्षिण भागातील बाजारपेठेत पाठविण्यासाठी कमी खर्चिक रेल्वे प्रकल्पाची आवश्यकता आहे. गेल्या तीस वर्षात शेती क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असताना जीएमआरटीमध्ये नवीन तंत्रज्ञान अद्याप का अवगत झाले नाही, हा प्रश्न आहे. जीएमआरटी प्रकल्प अभिमानास्पद असून हा प्रकल्प तालुक्यात कायम राहिला पाहिजे. मात्र त्यासाठी रेल्वे प्रकल्पही महत्त्वाचा असून त्यासंदर्भात ‘जीएमआरटी’च्या शास्त्रज्ञांनी तोडगा काढला पाहिजे, असे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत तोडगा न निघाल्यास आणि मार्ग बदलण्यात आल्यास त्याविरोधात लढा उभा केला जाईल, असा इशाराही डॉ. कोल्हे यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp dr amol kolhe oppose for changing the route of the pune nashik semi high speed rail project pune print news apk 13 zws