पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करावा, अशी सूचना खासदार बापट यांनी पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.पुणे रेल्वे विभागाच्या झालेल्या बैठकीत बापट यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, पुणे रेल्वे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा आणि रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ पुणे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून रेल्वे आणि पोलीस प्रशासनावर ताण पडत आहे. भविष्यातही पुणे स्थानकावरील ताण वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्थानकाला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्थानक टर्मिनल म्हणून विकसित केल्यास पुणे स्थानकावरील ताण कमी होईल, असे बापट यांनी सांगितले.

हेही वाचा : एमपीएससी उमेदवारांसाठी आनंदवार्ता….

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर खासगी वाहनांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शहरातील पुणे आणि इतर रेल्वे स्थानकावर वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रेल्वेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी. हडपसर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा उपलब्ध कराव्यात. रस्ते विकसित करावे, रेल्वेने येणाऱ्या आणि इतर प्रवाशांसाठी पीएमपीची बस व्यवस्था सुरू करावी, रेल्वे स्टेशन पार्किंग (महात्मा गांधी पुतळा) ते ताडीवाला रस्ता परिसरात पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी रेल्वेने परवानगी द्यावी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.