पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सकाळी थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दक्षिण उत्तर इमारत, तळमजला, दक्षिणेकडून खोली नंबर तीन (बूथ नं २१८) या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला.

खासदार बारणे यांच्यासोबत पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा यांनीही मतदान केले. निवासस्थानी त्यांचे औक्षण करण्यात आले. मतदानानंतर खासदार बारणे म्हणाले, मावळची जनता माझ्या बाजूने कौल देईल. तिसऱ्यांदा मी लोकसभेत पोहोचेल.

हेही वाचा…रवींद्र धंगेकराना पराभव दिसत असल्याने स्टंटबाजी सुरू: भाजप आमदार माधुरी मिसाळ

आज विरोधकाविषयी काय बोलणार नाही. मला विजयाची खात्री आहे. विरोधक काय बोलतात, यापेक्षा मावळची जनता विकासासोबत आहे. गेल्या दहा वर्षातील कामासोबत जनता आहे. मागीलवेळचे दोन लाख ३० हजार मताधिक्याचे माझेच रेकॉर्ड मी तोडेल, याची मला खात्री आहे.

Story img Loader