पुणे : गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले. यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे यशस्विनी सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते. ज्येष्ठ उद्योगिनी अनु आगा, केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, रोहिणी खडसे, अजित निंबाळकर, अंकुश काकडे, प्रशांत जगताप या वेळी उपस्थित होते. धोरण कुठवर आलं गं बाई या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. मीनाक्षी पाटील यांना साहित्यासाठी, कलावती सवणकर यांना कृषि क्षेत्रासाठी, रुक्मिणी नागापुरे यांना सामाजिक क्षेत्रासाठी, श्रद्धा नलमवार यांना क्रीडा क्षेत्रासाठी, संध्या नरे पवार यांना पत्रकारिता क्षेत्रासाठी, राजश्री गागरे यांना उद्योग क्षेत्रासाठी यशस्विनी सन्मान प्रदान करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा