जेजुरी,वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जेजुरीत पॅरा मोटरिंग सफरीचा आनंद घेतला. बाराशे फूट उंचीवरून त्यांनी जयाद्री पर्वत रांगातील खंडोबा मंदिर कडेपठार मंदिर ऐतिहासिक पेशवेतला होळकर तलाव व निसर्गरम्य कडेपठारचा डोंगर पाहिला.
खासदार सुळे जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या महाविद्यालयाच्या जवळच असणाऱ्या कडेपठार रस्त्यावरील फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरला त्यांनी भेट दिली.

सुप्रिया सुळेंचं पॅरामोटरींग (फोटो -प्रकाश खाडे)

जेजुरीची सफर झाल्यावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला आनंद

सेवानिवृत्त पायलट रामचंद्र काकडे यांनी जेजुरी तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारले आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी पॅरामोटर मध्ये बसून जमिनीपासून १२०० फुटांवरून जयाद्री पर्वतावर असलेले खंडोबा मंदिर कडेपठार मंदिर व निसर्ग रम्य परिसर पाहण्याचा आनंद लुटला. जेजुरीच्या डोंगर परिसरातील सफर झाल्यावर त्यांनी केंद्राचे संचालक काकडे यांचे कौतुक केले.येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना यातून खूप आनंद मिळेल असे त्या म्हणाल्या.

पाच महिन्यांपूर्वी सुरु झालं पॅरामोटरींग सेंटर

कडेपठारच्या डोंगर रस्त्यावरील एका मैदानात पॅरामोटरिंग सेंटर पाच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले असून पॅरामोटर स्पेन वरून आणण्यात आली आहे.याला जगात प्रसिद्ध असलेल्या रोटॅक्स कंपनीचे इंजिन बसवण्यात आले आहे हे अत्यंत सुरक्षित असून विमान चालवण्याचे काम सेवानिवृत्त पायलट चंद्रकांत महाडिक करत आहेत.हे सेंटर उभारण्यासाठी केंद्र शासनाचे संरक्षण खाते, राज्य शासनाचे महाराष्ट्र टुरिझम यांची परवानगी घेण्यात आली आहे.वातावरणातील अनुकूलता बघूनच पर्यटकांना रायडिंग साठी नेण्यात येते पॅरामोटरमध्ये पायलट व एक प्रवासी एकावेळी बसू शकतो. जेजुरी येथे खंडोबा दर्शना बरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे,अनेक जण या पॅरामोटरिंग सफरीचा आनंद घेत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp supriya sule enjoys paramotoring in jejuri saw jayadri mountain and kadaepathar from 1200 feet scj
Show comments