मुंबई-बेंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली.
हेही वाचा >>>पुणे: दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; जिल्ह्यातील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार,प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
या बैठका नियमित घेऊन रस्ता सुरक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच त्या त्या वेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकांतील सूचनांनुसार या रस्त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० किलोमीटर प्रति तास करण्यात यावा, तसेच त्याचे फलक लावावेत, स्टड लाईट, रम्बल स्ट्रीप, सोलर ब्लिकर्स, कर्ब पेंटिंग, ड्रिंक अँड ड्राईव्हला आळा घालणे, गो स्लो, अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा, अशा सूचना देणारे फलक यांसारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याबाबत यापूर्वीही मागणी केली होती त्यावरही तातडीने कार्यवाही व्हायला हवी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.