राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
त्यावेळी वंदना चव्हाण म्हणाल्या की, आमच्या ज्येष्ठ मंडळी आम्हाला सोडून गेले आहेत.ती आमच्यासाठी दुखद घटना आहे.तसेच काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जी भूमिका मांडली. तो निर्धार पाहून आम्हाला कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. शरद पवार यांनी देशासाठी आणि राज्यासाठी केलेल काम जनतेला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आता आम्ही पुन्हा त्याच जोमाने शरद पवार यांच्या सोबत काम करणार असून जनतेमध्ये जाऊन कौल मागणार आहेत.त्याच बरोबर जे सोडून गेलेले आहेत.त्या सर्वावर काय कारवाई करायची हे आमचे वरीष्ठ नेते मंडळी ठरवतील.तसेच देशात फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण सुरू असून हे देशातील जनता पाहत आहे.अशा शब्दात भाजपवर त्यांनी टीका केली.