पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीत थेट सोडण्यात येत असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. याप्रकरणी आयटी पार्कला नोटीस बजाविण्यात आली आहे.

प्रदूषित पाण्यामुळे मुळा नदीतील माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची २४ सप्टेंबरला तपासणी केली. या तपासणीत प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळून आले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ४ मेगालिटर असताना प्रत्यक्षात हा तिथे प्रतिदिन १.५ मेगालिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले. आयटी पार्कमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे अपुरे असल्याने हा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू आहे, असे मंडळाने नोटिशीत म्हटले आहे.

शिवाजी पार्क मैदानात धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
Health Minister prakash Abitkar Guillain Barre Syndrome Pune contaminated well water Sinhagad road
सिंहगड रस्ता परिसरातील विहिरीतील दूषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस; आरोग्यमंत्री आबिटकर यांची कबुली
guillain barre syndrome patients pune municipal corporation report survey
‘ त्या ‘ गावांना शुद्ध पाणी पुरविणे गरजेचे, काय म्हंटले नक्की महापालिकेच्या अहवालामध्ये ?

हेही वाचा >>> बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील अनेक विभाग बंद आहेत. याचबरोबर साठवण टाक्या योग्य स्थितीत नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी प्रकल्पाच्या आवारात सगळीकडे पसरली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा नाही. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून दररोज प्रक्रिया केलेल्या पाण्याचे केवळ ८ ते १० टँकर बाहेर पाठविले जातात. इतर सर्व अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी थेट मुळा नदीत सोडले जाते. प्रकल्पाच्या बाहेरील सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आहेत, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

नोटिशीला उत्तर देण्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सात दिवस देण्यात आले असून २२ नोव्हेंबरला मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून माहिती देण्याची सूचना करण्यात आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी सांगितले. तर आयटी पार्कमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्रयस्थ संस्थेमार्फत चालविला जातो. त्यांच्याकडून याबाबत माहिती घेतली जाईल. त्यानंतर नोटिशीला योग्य उत्तर दिले जाईल, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय इंदुले यांनी स्पष्ट केले.

तीन महिन्यांत तीन नोटिसा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) तीन वेळा नोटीस बजावली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत या नोटिसा आहेत. कुरकुंभ एमआयडीसीला सप्टेंबरमध्ये, रांजणगाव एमआयडीसीला ऑक्टोबरमध्ये आणि आता हिंजवडी आयटी पार्कला नोटीस बजाविण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी आमनेसामने आले आहेत.

Story img Loader