लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : येरवडा भागात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या कसबे याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली. कसबेची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे.

येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरात राहणारा गुंड प्रफुल्ल उर्फ गुड्डया गणेश कसबे (वय २३) याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कसबेविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला दोन वर्षांसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. कारवाईनंतर कसबे याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. तडीपार केल्याचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा येरवडा भागात वास्तव्यास आला. त्यानंतर त्याने पुन्हा दहशत माजविण्यास सुरुवात केली.

कसबेच्या दहशतीमुळे नागरिक त्याच्याविरुद्ध नागरिक तक्रार करण्यास घाबरत होते. त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कसबेला एक वर्षांसाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आतापर्यंत शहरातील १०० गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई करण्यात आली आहे.