अन्य विदा सुरक्षित, आयोगाची माहिती

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ३० एप्रिल रोजी होऊ घातलेल्या परीक्षेच्या हजारो उमेदवारांची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांमध्ये पसरल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. उमेदवारांचा वैयक्तिक विदा, प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा दावा करण्यात आला असला तरी एमपीएससीने परिपत्रक काढून केवळ बाह्यदुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशपत्रे फुटल्याचे सांगत परीक्षा वेळेवरच होणार असल्याचे जाहीर केले.
३० एप्रिलला राज्यभरात ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३’ ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच प्रवेशपत्रे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करत उमेदवारांचा वैयक्तिक विदा आणि प्रश्नपत्रिकाही आपल्याकडे असल्याचा दावा ‘हॅकर’ने केला. या प्रकारानंतर परीक्षार्थीमध्ये खळबळ माजली. एमपीएससीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. याची तातडीने दखल घेऊन एमपीएससीला परिपत्रकाद्वारे खुलासा करावा लागला. प्रवेशपत्रे २१ एप्रिलला आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर, तसेच तात्पुरत्या बाह्यदुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. केवळ तीच प्रवेशपत्रे समाजमाध्यमात प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली असून त्यामुळे बाह्यदुव्याची सुविधा बंद करण्यात आल्याचे एमपीएससीने म्हटले आहे. समाजमाध्यमांत प्रसिद्ध झालेली प्रवेशपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा ‘लीक’ झालेला नाही, याची तज्ज्ञांकडून खातरजमा करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांचा वैयक्तिक विदा, प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

समूह प्रशासकाविरोधात गुन्हा परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उतरवून घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. प्रवेशपत्र समाजमाध्यमांत फिरवणाऱ्या संबंधित समूहाच्या प्रशासकाविरुद्ध (अॅडमिन) सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले.

sharad pawar wrote letter to cm eknath shinde
Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Big update regarding MPSC Prelims Exam
‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट… अखेर तारीख…
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
MPSC, civil services, joint preliminary examination, Maharashtra Public Service Commission, 25 august, agricultural service,
‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…
Free electricity, farmers, mahavitaran,
मोफत वीज योजना : नाव शेतकऱ्यांचे, लाभ महावितरणचा, वीज ग्राहक संघटना म्हणते..
MPSC Students Protest in Pune
MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी सरकार मान्य करणार? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन

न्यायालयीन चौकशीची मागणी

परीक्षा सात दिवसांवर आलेली असताना एमपीएससीकडे असलेली लाखो विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे कोणीतरी समाजमाध्यमावर टाकतो, त्याशिवाय विद्यार्थ्यांची आयोगाकडे असलेली सर्व माहिती आणि या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आपल्याकडे असल्याचा दावा करतो हे खूप गंभीर आणि आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार म्हणाले. तसेच या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी, संबंधित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तत्काळ रद्द करून नव्या प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्याची मागणीही करण्यात आली.

तात्काळ कारवाई करा – राष्ट्रवादी

सुमारे ९० हजार परीक्षार्थीचे प्रवेशपत्र समाजमाध्यमांवर प्रसारित होणे हा मोठा निष्काळजीपणा आहे. याचा सूत्रधार कोण आहे, याची चौकशी करून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. हे सरकार राज्यातील तरुणांच्या भवितव्याशी खेळण्याचे काम करत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची ओळखपत्रे फुटल्याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यातून हा प्रकार कसा घडला आणि त्यामागे कोण आहे याचा उलगडा होईल. आयोगाचा कोणताही पेपर फुटलेला नसून ३० एप्रिलला होणारी परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होईल – किशोर राजे िनबाळकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

एमपीएससीला प्रश्न

’आयोगाकडे असलेली प्रवेशपत्रे ‘हॅकर’पर्यंत कशी पोहोचली?
’या व्यक्तीने प्रश्नपत्रिका काही व्यक्ती, विद्यार्थ्यांना दिली आहे का?
’दाव्यानंतर तासाभरात आयोगाने कोणती चौकशी केली?
’एवढय़ा कमी वेळात प्रश्नपत्रिका, विदा फुटला नसल्याचा दावा कशाच्या आधारावर केला?

(एमपीएससीचा विदा असल्याचा दावा करणारा संदेश.)