लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. मुलींमध्ये सातारा जिल्ह्यातील सोनाली भिसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून, मागासवर्गीय प्रवर्गातून यवतमाळ जिल्ह्यातील गजानन राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
Chandrapur district bank loksatta news
चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Appointments of 23 officers who joined the Indian Administrative Service Mumbai news
भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या २३ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या एकूण १६४ पदांचा समावेश होता. एमपीएससीतर्फे न्यायालयाचे आदेश, तसेच संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या आधीन राहून हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गातील शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. खेळाडू आणि इतर वर्गवारीमध्ये शिफारस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना निकालामध्ये तात्पुरते समाविष्ट करण्यात आलेआहे. या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी शासनाकडून करण्याच्या आधीन राहून ही शिफारस केली गेली आहे.

आणखी वाचा-पुणे : ताटात हात घातल्याने तरुणाचा खून, धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा

दरम्‍यान, अंतिम निकालात शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तर पत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके ऑनलाइन खात्यात (प्रोफाइल) पाठवण्याच्या दिनांकापासून दहा दिवसात आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, असेही स्‍पष्ट करण्यात आले.

Story img Loader