महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा प्रवास आता ‘सोप्याकडून अधिक सोप्याकडे.’ असा सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या विचारांची, दृष्टिकोनाची आणि भाषिक ज्ञानाची पारख होणारा निबंध हा प्रकारच राज्यसेवा परीक्षेतून गायब होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील इंग्रजी आणि मराठी भाषेच्या परीक्षेतही बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आता भाषा विषयांचे गुण एकूण गुणांमध्ये धरले जाणार नसून त्यात फक्त उत्तीर्ण होणे पुरेसे ठरणार आहे. पुढील परीक्षेपासून हे बदल लागू करण्यात येणार आहेत.
आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भाषा विषयांच्या परीक्षेलाही आता बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत राज्यसेवा परीक्षा घेण्यात येते. यामध्ये मुख्य परीक्षेत मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन असे विषय असतात. यातील सामान्य अध्ययनाची परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीने आणि भाषा विषयांची परीक्षा ही पारंपरिक म्हणजे दीघरेत्तरी घेण्यात येत होती. भाषा विषयांमध्ये विद्यार्थ्यांना निबंध लिहावा लागत होता. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्यांबरोबरच त्यांच्या विचारांची, भूमिका घेण्याच्या क्षमतेचीही पारख करण्यात येत असे. सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्येही हीच परीक्षा पद्धत प्रचलित आहे. मात्र, या सगळ्याला हद्दपार करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र भाषा विषयांची परीक्षा बहुपर्यायी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे आता भाषा विषयांमध्ये फक्त उत्तीर्ण होणे पुरेसे ठरणार आहे.
मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांची परीक्षा ही शंभर गुणांची असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण याप्रमाणे ५० प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. या दोन्ही परीक्षेत फक्त उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार असून त्यासाठी ४० गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र, भाषा विषयाचे गुण हे मुख्य परीक्षेच्या एकूण गुणांमध्ये गृहीत धरण्यात येणार नाहीत. सामान्य अध्ययनाच्या ४ प्रश्नपत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांवर विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. पुढील वर्षांच्या म्हणजे २०१६ च्या परीक्षेपासून हे बदल लागू होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलांबाबत सूचना करण्याचे आवाहन
परीक्षापद्धतीत करण्यात आलेल्या या बदलांबाबत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. ३० जूनपर्यंत आयोगाच्या  mpscreview@gmail.com या संकेतस्थळावर सूचना नोंदवायच्या आहेत.

बदलांबाबत सूचना करण्याचे आवाहन
परीक्षापद्धतीत करण्यात आलेल्या या बदलांबाबत सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. ३० जूनपर्यंत आयोगाच्या  mpscreview@gmail.com या संकेतस्थळावर सूचना नोंदवायच्या आहेत.