पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा २ डिसेंबरला घेण्यात येणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा १० डिसेंबरला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा राज्यातील पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या पदांच्या भरतीसाठी घेण्यात येते. एमपीएससीने ही परीक्षा २ डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले होते. या परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावरील प्रवेश, परीक्षेदरम्यानची घ्यावयाची काळजी या संदर्भातील उमेदवारांसाठीच्या सूचनाही एमपीएससीने मंगळवारीच प्रसिद्ध केल्या होत्या.

हेही वाचा… रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ९३ महाविद्यालयांमध्ये साखळी रक्तदान शिबिरे

मात्र प्रशासकीय कारणास्तव अचानकपणे या नियोजनात बदल करावा लागल्याचे एमपीएससीच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट झाले आहे. आता ही परीक्षा १० डिसेंबरला होणार असल्याचेही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc police sub inspector limited divisional pre competition exam has been postponed pune print news ccp 14 dvr