महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत सिंहगडावर असलेले सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या पुणे विभागाने प्रधान कार्यालयाला पाठविला आहे. या निवासस्थानी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून कर्मचाऱ्यांची वानवा ही प्रमुख कारणे असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: ‘पीएमआरडीए’कडून बांधकाम परवानगीचे विकेंद्रीकरण; क्षेत्रफळनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी

Worli Constituency Assembly Election 2024 Worli Chairs That Will Give A Unique Challenge To Aditya Thackeray Mumbai news
वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना अनोखे आव्हान देणाऱ्या खुर्च्या; शिवसेनेची (एकनाथ शिंदे) प्रचाराची अनोखी शक्कल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
guide on how and when to use government vehicles by peoples representatives in Pune
लाल दिव्याची गाडी आणि नैतिकता
vadgaon sheri vidhan sabha election 2024
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!
ST Corporation seeks permission from Election Commission for employee bonus Mumbai
कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी एसटी महामंडळाचे निवडणूक आयोगाला साकडे; लवकरच ९० हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
Maharashtra assembly elections 2024 confusion about who is the official candidate of Mahavikas Aghadi in Raigad
रायगडमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोण याचा गोंधळ सूरूच; शेकाप उमेदवारावर कारवाईची शिवसेनेची मागणी
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात निवासस्थाने होती. त्यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सिंहगड आणि अक्कलकोट या दोन निवासस्थानांची भर पडल्याने महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत एकूण नऊ निवासस्थाने झाली आहेत. सिंहगड निवासस्थान हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोशिएशनचा साधा बंगला होता. त्याच्या खोल्या देखील साध्या होत्या. यापूर्वी हा बंगला भाडेतत्त्वावर दिला होता. गेल्या वर्षी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. गडावर पर्यटनची ३२ गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडून पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या पर्यटनच्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासांची कामे महामंडळाने केली आहेत. या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारतीमध्येच दोन सूट, एक व्हीआयपी सूट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपाहारगृह आणि डायनिंगची सुविधा केली आहे. दोन सूट, व्हीआयपी सूट वातानुकूलित केला आहे. सूटमध्ये आकर्षक सिलिंग, आधुनिक फर्निचर बनविले असून आधुनिक स्वच्छतागृह केले आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी अशा दोन लोकनिवास (डॉरमेटरी) आहेत. एका वेळी प्रत्येकी आठ पर्यटक येथे राहू शकतात.

हेही वाचा >>>पुणे: एकविरा देवी गडावर रज्जू मार्ग ; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रकल्प उभारणार

दरम्यान, सिंहगड येथील निवासस्थानाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. एमटीडीसी पुणे विभागाकडून मात्र, पाणी, वीज आणि अपुरे बांधकाम अशा तांत्रिक कारणांमुळे बरेच दिवस हे निवासस्थान सुरू करण्यात आले नव्हते. मात्र, सिंहगड हा शहरापासून जवळच आहे. परिणामी गडावरील महामंडळाच्या निवासस्थानी रात्री मुक्काम करण्यास पर्यटक अनुत्सुक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महामंडळाच्या तुटपुंज्या वेतनामुळे या ठिकाणी काम करण्यास कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे हे निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या पुणे विभागाने एमटीडीसीच्या मुख्य कार्यालयाला पाठविला आहे.

नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी महामंडळाच्या पुणे विभागातील निवासस्थानांमध्ये ७५ ते ८० टक्के आरक्षण झाले आहे. सिंहगडावरील निवासस्थानी रात्री मुक्कामाला पर्यटक उत्सुक नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचारी मिळत नाहीत. या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि येत आहेत. मात्र, समांतर पातळीवर सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्याबाबत मुख्य कार्यालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- मौसमी कोसे, एमटीडीसी पुणे विभाग, प्रादेशिक व्यवस्थापक