पुणे : मुद्रांक अभय योजनेला राज्यातील नागरिकांची उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी या योजनेला ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ७२ हजार ९५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५६ हजार ३२ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्यानुसार ३९३.०४ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कमी मुद्रांक शुल्क किंवा मुद्रांक शुल्क चुकविलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सन १९८० ते २०२० या कालावधीत सदनिका घेतली असेल, मात्र मुद्रांक शुल्क कमी भरले असेल किंवा दहा रुपयांच्या मुद्रांकावर विक्री करारनामा केल्यानंतर नोंदणीसाठी दाखल केले नाही, बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये दाखविलेल्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले, अशा सदनिकाधारकांसाठी राज्य सरकारने ही योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीसाठी पहिला, तर १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी दुसरा असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पहिला टप्पा राबविण्यात येणार होता; मात्र पहिल्या टप्प्याला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील योजना सुरू आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, त्यामध्ये वाढ करीत राज्य सरकारने ३० जूनपर्यंत, तर पुन्हा मुदतवाढ देत आता ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

हेही वाचा…पुणे: अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

दरम्यान, सन १९८० ते २००० आणि सन २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी दुसऱ्या टप्प्यात मुद्रांक शुल्कावर ५० टक्के सवलत आहे, तर दस्तांवर असलेल्या दंडात २० टक्के सवलत आहे. त्याकरिता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या दस्तासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी (सहजिल्हा निबंधक) कार्यालयात अर्ज करता येतील. शिवाय नोंदणीसाठी सादर केलेल्या दस्तांबाबत संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करता येतो.

हेही वाचा…IAS पूजा खेडकर प्रकरण: पिंपरीच्या वायसीएममधील डॉक्टरांची चौकशी करावी- आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी

मुद्रांक अभय योजनेचा आढावा

प्राप्त प्रकरणे – ७२,९५५
निकाली काढलेली प्रकरणे – ५६,०३२

वसूल झालेली प्रकरणे – २८,६४७
वसूल मुद्रांक शुल्क – २९९,८१,४१,७००

वसूल दंड – ९१,३७,२६,३०५
वसूल नोंदणी शुल्क – १,८६,१६,२९१

एकूण वसूल रक्कम – ३९३,०४,८४,२९६