पुणे : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. ’लाडकी बहीण, लाडका भाऊ‘ अशा योजना जाहीर करुन मतदारांना आत्कृष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’च्या जाहिरातीत पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या वरुडे गावातून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली आहे. जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र वापरल्याने कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत नसल्याचा खुलासा महायुती सरकारने केला असून, संबंधित जाहिरात माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातून प्रसारित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार

हेही वाचा : मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरूडे गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले. तांबे कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला. शोध घेतल्यानंतर ज्ञानेश्वर तांबे यांचा ठावठिकाणा लागला नाही. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर ज्या व्यक्तीचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. ती व्यक्ती अडीच ते तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

वडेट्टीवार यांचा समाजमाध्यमात संताप

महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनांवर टीका होत असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिकांना आकृष्ट करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारने स्वत:ची पाठ थोपटण्यासाठी एका कुटुंबाच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमात महायुती सरकारच्या जाहिरातबाजीवर संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : पुणे : ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्ष, संचालकांसह मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

तांबे यांच्या पुत्राची विनंती

आमचे वडील गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा आम्ही शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. आता त्यांचे छायाचित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीत दिसले आहे. ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. आम्हाला आमच्या वडिलांचे सरकारने दर्शन घडवून द्यावे, अशी विनंती ज्ञानेश्वर तांबे यांचा मुलगा भरत तांबे यांनी समाजमाध्यमात प्रसारित केलेल्या चित्रफितीतून केली आहे.

हेही वाचा : गुलाबी जॅकेटवर प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांना सुनावलं; म्हणाले, “मी माझ्या पैशाने कपडे खरेदी करतो, तुम्ही…”

पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू केला आहे. तांबे कुटुंबीय शिरुर तालुक्यातील वरुडे गावात वास्तव्यास आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरुडे गावाचा समावेश होतो. रात्री उशीरा शिक्रापूर पोलिसांचे पथक वरुडे गावात दाखल झाले. पोलिसांनी तांबे कुटुंबीयांची भेट घेत माहिती घेतली. तेव्हा ज्ञानेश्वर तांबे गेल्या काही वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. वारी तसेच इतर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेल्यानंतर ते घरी परतत नव्हते. डिसेंबर २०२१ पासून ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे छायाचित्र जाहिरातीत दिसून आले. ज्ञानेश्वर तांबे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नव्हती. जाहीरातीत तांबे यांचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता शिक्रापूर पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली असून, पुढील कार्यवाही केली जात असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिली.