मुलाखतअनंत भिडे

शालेय मुलांमध्ये मूलभूत संशोधनाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी डॉ. व्ही. जी. भिडे यांनी भारतीय विद्या भवन या संस्थेच्या साहाय्याने सुरू केलेल्या विज्ञानशोधिका केंद्राला नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण झाली. या केंद्रातर्फे वर्षभरात पुण्यातील पहिले ‘इनोव्हेशन हब’ उभे राहणार असून, त्याला कोलकात्याच्या ‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स’ संग्रहालयाकडून मान्यता मिळाली आहे. या ‘हब’चा निम्मा खर्च विज्ञानशोधिकेतर्फे, तर निम्मा खर्च सरकारतर्फे केला जाणार आहे. या विज्ञानशोधिकेचे कार्य आणि भविष्यातील योजना याविषयी ‘लोकसत्ता’ने केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे यांच्याशी संवाद साधला.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा

विज्ञानशोधिका केंद्र सुरू करण्यामागे विचार काय होता? व्याप कसा वाढला?

– या केंद्राची वाटचाल १९९२ मध्ये सुरू झाली. माझे वडील डॉ. व्ही. जी. भिडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. ते भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक, अध्यापक आणि हाडाचे शिक्षक. मुलांना नवीन काहीतरी शिकवण्यात त्यांना खूप रस आणि उत्साह वाटे. मग ती शाळेतली मुले असोत, किंवा पीएच.डी.चे विद्यार्थी असोत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ‘बाल विज्ञान चळवळ’ या नावाने एक उपक्रम सुरू केला. भारतीय विद्या भवन या संस्थेने त्यांना सुलोचना नातू विद्यालयात एक खोली देऊ केली. भिडे यांचे सहकारीही त्यांना मदत करू लागले. शालेय मुलांनी नुसते पुस्तकात वाचून विज्ञान शिकू नये, ती जेवढे आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करतील तेवढे शिकतील, हा या उपक्रमामागचा विचार. एखाद्या झाडाला नेहमी तीनच पाने का येतात, अशा उदाहरणांतून सममिती शिकता येते, किंवा दरवाजा उघडताना हँडलला धरूनच का उघडतात, हे पाहून भौतिकशास्त्रातील बल ही संकल्पना समजावून सांगता येते. त्या वेळी पुण्यात या प्रकारची संस्था नव्हतीच. पुढे संस्थेच्या विस्ताराचे प्रयत्न सुरू झाले. पालिकेकडून त्यासाठी जागा मिळाली, तसेच दोराबजी टाटा ट्रस्ट व इतरही दाते पाठीशी उभे राहिले.

२००६ मध्ये सेनापती बापट रस्त्याजवळ मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राची इमारत बांधली गेली. त्याच सुमारास व्ही. जी. भिडे यांचे निधन झाले. नंतर ‘इस्रो’चे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे यांनी केंद्राचे संचालक म्हणून त्याच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. या जागेत सात प्रयोगशाळा सुरू झाल्या आणि शाळांच्या अभ्यासक्रमांशी मिळताजुळता, पण अनौपचारिकरीत्या विज्ञान शिकण्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. कोथरूडमध्ये भारतीय विद्या भवनच्याच परांजपे शाळेत आणि निगडीमध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळेत विज्ञानशोधिकेची उपकेंद्रे सुरू झाली. तिथेही प्रमुख केंद्रासारख्याच सात प्रयोगशाळा आहेत.

कोणत्या वयाची मुले विज्ञानशोधिकेत येऊ शकतात?

– शाळा सुरू झाल्यावर जून ते मार्च या काळात मुले पूर्णत: स्वेच्छेने विज्ञानशोधिकेत येतात. त्यासाठी त्यांच्याकडून काही शुल्क घेतले जाते. साधारणत: पाचवी ते नववी इयत्तांमधील मुलांचा वयोगट केंद्रासाठी निश्चित केला आहे. काहीतरी वेगळे शिकणे हे येथील शिक्षणाचे स्वरूप आहे. शुल्क भरण्याची परिस्थिती नसणाऱ्या मुलांसाठीही पर्सिस्टंट, शिर्के ट्रस्ट, विकफील्ड असे काही दाते पुढे आले आहेत. त्यामुळे वंचित मुलेही येथे येऊन शिकतात. केंद्राने उन्हाळी सुट्टय़ांसाठी काही आठवडय़ांच्या शिबिरांची आखणी केली आहे, तसेच एकेका दिवसाचीही शिबिरे होतात. दहावीच्या मुलांना अभ्यासाचा व्याप मोठा असल्यामुळे ती वर्षभर येऊ शकत नाहीत. त्यांना त्यांच्या अभ्यासात उपयोगी ठरतील असे काही अभ्यासक्रम आम्ही या वर्षी तयार केले आहेत.

आता इतर काही ठिकाणीही वेगळय़ा प्रकारे विज्ञान शिकवण्याचे प्रयत्न होतात. त्यात विज्ञानशोधिका केंद्राचे वेगळेपण काय?

– या केंद्राच्या वाटचालीत अनेक

शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा केंद्राला खूप फायदा झाला. शाळांमध्ये मोठय़ा विज्ञान प्रयोगशाळा असतात, पण अनेक ठिकाणी योग्य उपकरणे नसल्याचे दिसून येते. विज्ञानशोधिका केंद्रात प्रयोग करण्यासाठी पुरेशी उपकरणे आहेतच, शिवाय आमची स्वत:ची काही किट्स तयार केली आहेत. ‘नुसते पहा आणि शिका,’ असे न करता मुलांना ती स्वत: मुक्तपणे हाताळता येतात.

नजीकच्या काळात वेगळे काय करणार?

– ग्रामीण भागात सगळीकडे विज्ञान प्रयोगशाळा नाहीत. सातवी ते नववी इयत्तांच्या अभ्यासक्रमांसाठी वापरता येतील अशी काही सोपी किट्स आम्ही तयार करतो आहोत. बाजारातील ‘सायन्स किट्स’पेक्षा ती वेगळी आहेत. नुसती किट्स न देता ती वापरायची कशी आणि कसे शिकवायचे याचे प्रशिक्षण शिक्षकांना देणार आहोत. काही काळाने शिक्षकांसाठी उजळणी शिबिरेही घेतली जातील. जूनपर्यंत या किट्सची प्रारूपे तयार होतील. त्यापुढे जाऊन फिरती प्रयोगशाळा सुरू करण्याचाही विचार आहे. शाळांच्या विज्ञान प्रयोगशाळा अधिक चांगल्या व्हाव्यात म्हणून आम्ही त्यांना सल्लाही देऊ शकतो. उपकरणे कोणती घ्यावीत हे सुचवण्यापासून प्रत्यक्ष प्रयोगशाळा लावून देण्यापर्यंत आम्ही मदत करू शकतो.

इनोव्हेशन हबचा उद्देश काय?

– हे ‘हब’ विज्ञानशोधिका केंद्राचेच पुढचे पाऊल असेल. आपण जे शिकलो त्याचा उपयोग मुले त्यांच्या रोजच्या जीवनातील छोटय़ा छोटय़ा समस्या सोडवण्यासाठी करू शकतात. माझ्या निरीक्षणानुसार पाश्चात्त्य जगात आठवडा सुट्टीत घरोघरी कुणीतरी काही दुरुस्तीचे काम काढते आणि मुलेही त्यात मदत करत असतात. हे चित्र आपल्याकडे थोडे कमी पाहायला मिळते. खिळा ठोकणे किंवा गळणाऱ्या नळाचा वॉशर बदलणे, ही साधी कामे घरी करणे जमू शकते, पण सहसा ते केले जात नाही. हाताने करायच्या अशा कामांचा अनुभव खूप शिकवून जातो. मी माझी समस्या सोडवू शकतो, हे कळले की नवीन कल्पनांनाही चालना मिळते. ‘इनोव्हेशन हब’मध्ये एखाद्या नवीन उत्पादनाची कल्पना मांडण्यापासून त्याचे बाजारात आणता येईल असे प्रारूप बनवण्यापर्यंतचे काम होऊ शकते. त्यासाठी विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत मिळेल. मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रात न येणारे विद्यार्थी किंवा इतर कुणीही काही या ठिकाणी काम करू शकेल. पुढील वर्षभरात त्याला मूर्त स्वरूप येईल.

Story img Loader