कास पठारासारखे निसर्गसौंदर्य, संवर्धनासाठी वन विभागाकडून खास मोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाळ्यानंतर साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात सातारा जिल्ह्य़ातील कास पठारावर फुलणारी वैशिष्टय़पूर्ण विविधरंगी फुले आता जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागली आहेत. मात्र अशाच प्रकारच्या रानफुलांचा बहर सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमधील पठार आणि माच्यांवरही आढळतो. माळशेज घाटावरील पठारावरही अशाच प्रकारची रानफुले असून वनविभाग त्याच्या संवर्धनाची विशेष मोहीम राबविण्याच्या विचारात आहे.

माळशेज परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाट डोंगररांगांमध्ये मोडतो. वर्षभर या भागातील जंगलामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण वनस्पती आढळतात. त्यात निरनिराळ्या प्रकारच्या रानफुलांचाही समावेश आहे. विविध आकाराची आणि रंगांची ही फुले अतिशय मोहक आहेत. विशेषत: पठारावरील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अतिथिगृहालगत दहा हेक्टर भागात मोठय़ा प्रमाणात रानफुले आढळतात. काही दिवसांच्या अंतराने जांभळ्या, पिवळ्या, लाल आदी रंगांची रानफुले येथे मोठय़ा प्रमाणात फुलतात. सध्या वनखात्याचे कर्मचारी त्या फुलांची छायाचित्रे काढून ठेवत आहेत. मात्र ही कोणती फुले आहेत, त्यांचे वैशिष्टय़ काय, जैवविविधतेत त्यांचे स्थान काय याविषयी अभ्यास आणि संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत टोकावडे परिक्षेत्राचे वनसंरक्षक तुकाराम हिरवे यांनी व्यक्त केले आहे.

स्थानिक आदिवासींतर्फे अभ्यास

टोकावडे परिसरातील अनेक गाव-पाडय़ांना उपजिविकेसाठी सामूहिक वनजमिनीचे पट्टे मिळाले आहेत. त्यानुसार गावांनी आपापल्या वाटय़ाला आलेल्या जंगलाचे संरक्षण करणे सुरू केले आहे. मात्र त्याचबरोबर त्यांना एक नोंदवही देण्यात आली असून त्यात परिसरातील वृक्षवल्लींची माहिती नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार शिरवाडीतील राजाराम दत्तू दरवडा या सुशिक्षित तरुणाने जंगलातील झाडांची नोंद ठेवण्यात सुरुवात केली आहे. दीड वर्षांत त्याला त्याच्या जंगलात १२२ प्रकारच्या वनस्पती आढळल्या. मोठे वृक्ष, झुडपे तसेच वेलींचा समावेश आहे.

कासच्या पठारावरील फुलांचा अभ्यास झाला आहे. तिथे दरवर्षी साधारण २०० प्रकारची रानफुले फुलतात. माळशेज परिसरातही वैशिष्टय़पूर्ण फुले फुलतात. त्यातील काही फुले स्थानिक आदिवासी रानभाज्या म्हणून खातात. रानवांग्यांचे फूलही सुंदर असते. मात्र एकूणच माळशेजच्या जैवविविधतेबाबत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे येथील दुर्मीळ प्रजातीच्या वनस्पतींची ओळख आणि महात्म्य जगासमोर येईल. पर्यटन आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने या रानफुलांचे संवर्धन महत्त्वाचे ठरेल. 

शेखर राजेशिर्के, निसर्ग अभ्यासक

शहरालगतही रानफुले

अंबरनाथ तालुक्यातील जी.आय.पी., चिखलोली तसेच भोज धरण परिसरातील जैवविविधता अभ्यासादरम्यान संशोधकांना या परिसरात क्रोटोलॅरिया, बालसम, स्मिथिया आदी वैशिष्टय़पूर्ण रानफुले आढळली. विठ्ठलवाडी ते पुणे रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूलाही अनेक प्रकारची रानफुले आढळतात.