पुणे : आमच्या आरपीआय पक्षाने सगळ्या पक्षांना ताकत दिली आहे. माझी पार्टी मोठी नाही. पण आम्ही दुसऱ्या पक्षाला भक्कम बनवत आहे. अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतो. त्यांना ताकद दिली. आता भाजप सोबत आहे आता भाजपला ताकद दिली आहे. राज्यात सध्या महायुतीच सरकार आले आहे. यात आम्हाला 1 मंत्रिपद मिळावे आणि १२ आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आमची आहे. मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करणार आहोत. मुंबई महानगर पालिकेच्या आगमी निवडणुकीसाठी भाजपप्रणीत महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काहीही गरज नाही. भाजपने महायुतीत मनसेला घेऊ नये, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. तरीही महायुतीत मनसेला घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय आठवले गट) वेगळी भूमिका घेईल, असा इशारा आरपीआयचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे, खजिनदार अभिजित बारभाई यावेळी उपस्थित होते.आठवले म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका सर्वज्ञात आहे. त्यांच्या भूमिकेमुळे मुंबईतील गुजराती, दक्षिण भारतीय आणि मोठ्या संख्येने असलेला उत्तर भारतीय मतदार त्यांच्यावर नाराज आहे. भाजपने मनसेला महायुतीत घेतल्यास मुंबईत हा मतदार भाजपपासून दूर जाईल. शिवाय त्या-त्या राज्यातही भाजपला तोटा होईल. त्यामुळे भाजपने मनसेला आपल्या सोबत घेऊ नये. आमचाही प्रयत्न तसाच असणार आहे.”

हेही वाचा : पुणे : औंधमध्ये पादचारी ज्येष्ठाचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

आम्ही १५० जागा मिळवण्याचा तिघांचा एकत्रित प्रयत्न आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच नाव घेण्याचा अधिकार सर्वाना आहे. उद्धव ठाकरे सोबत बरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच चिन्ह मिळेल अस वाटत आहे. एकनाथ शिंदे काम करत आहेत. आता उद्धव ठाकरे दिसत नाही. शिवसेनेचे आरपीआय सारखे गट पडणार नाही. शिवसेनेचे दोनच गट आहेत. आमच्यात अनेक गट अनेक नेते आहेत. माझी भूमिका ऐक्य करावे अशी आहे.आमची अवस्था शिवसेनेसारखी व्हावी अशी इच्छा आहे. सगळ्यात स्ट्रॉंग मी आहे. माझे नेते कार्यकर्ते गावागावात आहेत. पण एवढी ताकद नाही की आम्ही खासदार आमदार निवडून आणू.

हेही वाचा : पुणे : आता मिळकतकराची आकारणी सदनिकांमधील सुविधांवर आधारित ?

एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कला दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार आहे. महापालिका नक्की शिंदे गटाला पाठींबा देईल. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा बांद्राला घ्यावा,मनसेने पण घ्यावा पण तो दुसरीकडे घ्यावा असे रामदास आठवले म्हणाले. सध्या देशात मोदींचा वारं आहे,तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि माझं वार वार आहे, मी जिकडे जातो तिकडे वारं असत आणि सध्याचे वारे आमच्या बाजूला आहे. महागाईच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की , जगात महागाई आहे,देशातील महागाई कमी झाली पाहिजे अशी भूमिका आमची आहे,मतदार आमच्या सोबत आहे,आम्हीच महागाई कमी करणार आहे.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौक परिसरातील सेवा वाहिन्यांच्या स्थलांतराला गती

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक सुरू आहे.आमची मागणी आहे की काँग्रेसच अध्यक्षपदी राहुल गांधी यांनाच करावे. त्यामुळे आम्हाला फायदा होत आहे.विरोधीपक्षाला एकच सांगतो की, तुम्ही सगळे भेटत जावा आम्ही मोठे होत जाऊ, मोदींचा सामना करणं अवघड आहे. मोदी स्ट्रॉंग नेते आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी भेटत जावा. नितीशकुमार,ममता एकत्रित येत आहेत.चांगल आहे,आम्ही तुमच्याशी लढू तुम्ही आमच्याशी लढा असे रामदास आठवले म्हणाले.आरपीआय खासदार,आमदार निवडणूक भाजप चिन्हावर लढणार नाही,तर शिंदे गट धनुष्यबाणवरच लढतील,उद्धव ठाकरे यांनाही वेगळं चिन्ह मिळेल. पुण्यात आम्ही महापालिका निवडणुकांसाठी २५ जागांसाठी मागणी करणार आहे. असे यावेळी रामदास आठवले म्हणाले.

अमित शहांनाही मनसे नकोशी

भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुंबई पालिकेसाठी शिंदे सेनेसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मनसेचा कुठेही उल्लेख केलेला नाही. आम्ही भाजप सोबत आहोतच. आमची ताकद भाजपसोबत असल्यामुळे अन्य कुणालाही भाजपने सोबत घेऊ नये, असेही आठवले म्हणाले.