पुणे : आमच्या आरपीआय पक्षाने सगळ्या पक्षांना ताकत दिली आहे. माझी पार्टी मोठी नाही. पण आम्ही दुसऱ्या पक्षाला भक्कम बनवत आहे. अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत होतो. त्यांना ताकद दिली. आता भाजप सोबत आहे आता भाजपला ताकद दिली आहे. राज्यात सध्या महायुतीच सरकार आले आहे. यात आम्हाला 1 मंत्रिपद मिळावे आणि १२ आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आमची आहे. मुंबई महापालिका आम्ही जिंकणारच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करणार आहोत. मुंबई महानगर पालिकेच्या आगमी निवडणुकीसाठी भाजपप्रणीत महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काहीही गरज नाही. भाजपने महायुतीत मनसेला घेऊ नये, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. तरीही महायुतीत मनसेला घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय आठवले गट) वेगळी भूमिका घेईल, असा इशारा आरपीआयचे नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेसाठीच्या महायुतीत मनसे नको ; रामदास आठवले यांचा सल्ला
राज ठाकरे यांना सोबत घेतले तर परप्रांतीय मत पडणार नाहीत. त्यामुळे राज ठाकरे याना सोबत घेऊ नये.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
पुणे
Updated: या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-09-2022 at 15:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns not be part of mahayuti for mumbai municipal corporation advice from ramdas athawale svk