राहुल खळदकर

पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या नाशिकमधील कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (अमली पदार्थ विराेधी पथक-एनसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत एनसीबीच्या पथकाने २०० किलो अल्प्राझोलम जप्त केले. अल्प्राझोलमचा वापर मनोविकारासाठी लागणाऱ्या औषधांसाठी केला जातो. अल्प्राझोलम या रसायनाचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू

मनोविकार, चिंंताविकारासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधात अल्प्राझोलमचा वापर माफक प्रमाणावर केला जातो. त्यासाठी अन्न, औषध प्रशासन विभागाकडून मंजुरी दिली जाते. मनोविकार, चिंताविकारातील औषधी गोळ्यात वापरण्यात येणाऱ्या अल्प्राझोलमचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक बलकवडे यांनी नाशिकजवळील शिंदे गावात मेफेड्रोन तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता.

हेही वाचा >>> “सरकारच्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्र मोडीत…”, रोहित पवार यांची राज्य सरकारवर टीका म्हणाले…

मुंबई पोलिसांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, तसेच मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ जप्त केले होते. जुन्नर, शिरूर तालुक्यात अल्प्राझोलमची बेकायदा निर्मिती होत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने जुन्नर, शिरूर परिसरात छापा टाकून २०० किलो अल्प्राझोलम जप्त केले. एनसीबीच्या पथकाने याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> “बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार प्रचार करतील”, हसन मुश्रीफांचं मोठं विधान

नशेसाठी झोपेच्या गोळ्या

निद्राविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने गोळ्या देण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर करत असल्याचे आढळून आले आहे. पुणे-मुंबईतील काही औषध विक्रेते बेकायदा अशा प्रकारच्या गोळ्यांची विक्री करतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय, तसेच चिठ्ठीशिवाय झोपेच्या गोळ्यांची विक्री करणे बेकायदा आहे. अल्प्राझोलम या रासायनिक पदार्थाचा वापर झोपेच्या गोळ्या तयार करण्यासाठी केला जातो.

Story img Loader