राज्य शासनाकडून पिंपरीत प्रतिनियुक्तीवर आलेले एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे व करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार यांच्या बदलीवर गुरुवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंढे यांच्या जागी साताऱ्यातील उपजिल्हाधिकारी भानुदास गायकवाड यांची तर पवार यांच्या जागेवर शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत माने यांची वर्णी लागल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
चार वर्षांपूर्वी पिंपरी पालिकेत आलेल्या मुंढे यांनी जकात अधीक्षक म्हणून काम करताना ५०० कोटींवर असलेले जकातीचे उत्पन्न १२०० कोटींवर नेऊन ठेवले. शहाजी पवार यांनी करसंकलन विभागातून पालिकेला २६४ कोटींपर्यंतचे उत्पन्न मिळवून देत मिळकतींची संख्या साडेतीन लाखावर नेली. दोन्ही अधिकाऱ्यांची चांगली कामगिरी लक्षात घेऊन तीन वर्षांची मुदत संपल्यानंतरही आणखी वर्षभर काम करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासनाच्या सेवेत परतण्याचे वेध लागले होते. मात्र, पर्यायी व्यवस्था होत नसल्याने बदलीचा निर्णय होत नव्हता. अखेर, गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाल्याचे सांगण्यात आले. या माहितीला दुजोरा देत अधिकृत आदेश प्राप्त झाले नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पिंपरी पालिकेतील मुंढे, पवार यांची बदली
राज्य शासनाकडून पिंपरीत प्रतिनियुक्तीवर आलेले एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे व करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार यांच्या बदलीवर गुरुवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.
First published on: 07-06-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mundhe and pawar transfered from pcmc