आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करू, असा विश्वास भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पैठणी व्यावसायिकाची एक कोटीपेक्षा अधिक रुपयांना फसवणूक

हेही वाचा – पतंगबाजीत सारेच दंग, पोलिसांचे नायलाॅन मांजावर लक्ष

शंकर जगताप म्हणाले, लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विविध योजना, उपक्रम भाजप राबवत आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. पुढे ते म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरात एक हजार ४४२ बूथ आहेत. आमचे बूथप्रमुख तयार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एक हाती सत्ता आणायची आहे. २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली होती. २०१७ पेक्षा अधिक नगरसेवक आगामी निवडणुकीत निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचे शंकर जगताप यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, सध्या स्वबळावर की महायुती म्हणून आगामी महानगरपालिका लढणार हे स्पष्ट नाही. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर पुढील रणनीती ठरणार असल्याचंदेखील शंकर जगताप यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation election pimpri chinchwad municipal corporation bjp shankar jagtap kjp 91 ssb