पुणे : शहरातील रस्त्यांवर, पदपथावर, दुभाजकांवर साचलेला कचरा तसेच रस्त्यांवर लावलेली बेवारस वाहने, अधिकृत जाहिरात फलक, बॅनर काढण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी एकाच दिवशी एकाच भागात महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी, अधिकारी यांना रस्त्यावर उतरून स्वच्छता केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील परिमंडळनिहाय (झोन) ‘सर्वंकष स्वच्छता’ करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून, येत्या सोमवारपासून (९ डिसेंबर) त्याची सुरुवात केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अतिक्रमण, आकाशचिन्ह, पाणीपुरवठा, मलनि:सारण अशा विविध विभागांतील कर्मचारी एकाच वेळी रस्त्यावर उतरून ही स्वच्छता करणार आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या मोहिमेची माहिती दिली.

हेही वाचा…पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?

शहरातील अनेक भागांतील मोकळ्या जागांवर, रस्त्यांवर, पादचारी मार्ग, तसेच दुभाजक अशा ठिकाणी कचरा असतो. अनेक चौकांमध्ये बेकायदा जाहिरातफलक, बॅनरवर कारवाई होत नाही. त्यामुळे शहर बकाल दिसते. शहर स्वच्छ करण्यासाठी एकाच दिवशी पालिकेतील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबवतील, असा निर्णय पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पालिकेतील विभागप्रमुखांची बैठक घेतली.

पुणे महापालिकेचे पाच परिमंडळे आहेत. यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो. परिमंडळनिहाय ही मोहीम राबविली जाणार आहे. पालिकेचे पंधराशेहून अधिक कर्मचारी हे काम करतील. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातून सोमवारपासून ही मोहीम सुरू होईल. परिमंडळ एकमध्ये ९ ते १४ डिसेंबरदरम्यान हा उपक्रम होणार आहे.

हेही वाचा…शाळांच्या प्रसाधनगृहात आता गजराची व्यवस्था…काय आहे विद्यार्थी सुरक्षेसाठी नवे धोरण?

अशी होणार स्वच्छता मोहीम

बेकायदा जाहिरातफलक काढणे

रस्ते स्वच्छ करणे, माती उचलणे

महिनोन् महिने रस्त्यावर उभी बेवारस वाहने हटविणे

राडारोडा उचलून खड्डे दुरुस्त करणे

पावसाळी गटारे, चेंबरची दुरुस्ती करणे

डासांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करून औषध फवारणी करणे

शाळा, महाविद्यालये, तसेच मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना सहभागी करून घेणे