लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: मिळकतकरातील घरमालकांना मिळणारी चाळीस टक्क्यांची सवलत रद्द करून ज्या मिळकतधारकांकडून तीन वर्षांच्या थकबाकीची वसुली करण्यात आली आहे आणि ज्या नव्या निवासी मिळकतींना शंभर टक्के कर आकारणी करण्यात आली आहे, अशा मिळकतकधारकांकडून चार टप्प्यांमध्ये रक्कम वळती करण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून घेण्यात आला आहे.

घरमालक स्वत: रहात असलेल्या मिळकतींना मिळकतकरामध्ये ४० टक्क्यांची सवलत दिली जात होती. मात्र ही सवलत रद्द करण्यात आल्याने महापालिकेने २०१९ पासून थकीत रकमेची देयके शहरातील सुमार एक लाख मिळकतधारकांना पाठविली. ही रक्कम किमान पस्तीस हजारांपेक्षा जास्त असल्याने त्याबाबत मिळकतधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतला होता. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम भरली आहे, त्यांची रक्कम चार टप्प्यात वळती करण्याचा निर्णय कर आकारणी आणि करसंकलन विभागाने घेतला आहे. शंभर टक्के मिळकतकराची आकारणी केलेल्या नव्या मिळकतींनाही याच पद्धतीने सवलत दिली जाणार आहे.

आणखी वाचा- पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांची माहिती एका क्लिकवर

महापालिकेने ९७ हजार ५०० नागरिकांना नोटीस पाठवली होती. त्यापैकी सुमारे ३३ हजार नागरिकांनी ८० कोटी रुपयांची ४० टक्क्याच्या फरकाची रक्कम भरलेली आहे. तर नवीन १ लाख ६७ हजार मिळकतींमधून सुमारे १७० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत गेल्या तीन वर्षात जमा झाले आहेत. ही सुमारे २५० कोटीची रक्कम महापालिकेला पुन्हा मिळकतधारकांना परत करावी लागणार आहे. दरम्यान, १ मे पासून २०२३-२४ या वर्षाचा मिळकतकर आकारणी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चार टप्प्यात रक्कम वळती करून देयके पाठविण्यात येणार असल्याने पंधरा मे पासून देयकांचे वितरण करण्यात येणार आहे.