गणेश यादव

पिंपरी : पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर ८ हजार २२९ खड्डे पडले होते. त्यापैकी ७ हजार ८१२ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. ४१७ खड्डे बुजविण्याचे राहिले असून पावसाळा संपल्याने सर्व खड्डे पुन्हा नव्याने डांबराने भरण्यात येणार आहेत. यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

Order of Additional Commissioner to remove encroachments of illegal crackers stalls on roads and footpaths
रस्त्यांवर, पदपथांवर उभे राहिले बेकायदा फटाके स्टॉल, कोण आहे जबाबदार!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Drugs worth Rs 485 crore seized by Mumbai Police in a year
मुंबई पोलिसांकडून वर्षभरात ४८५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
Two children were injured in pune Narhe due to sudden explosion while bursting firecrackers
दिवे घाटात दूध टँकरची पीएमपी बसला धडक, वाहकासह आठ प्रवासी जखमी
Western Expressway, Repair of bridges Western Expressway, Western Expressway latest news,
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
illegal constructions Navi Mumbai, Navi Mumbai,
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर सहा वर्षे उलटूनही कारवाई नाही, उच्च न्यायालयाचा नियोजन यंत्रणांच्या नाकर्तेपणावर संताप
mva seat sharing formula
मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं नेमकं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरात ६३३ खड्डे होते. पावसाळ्यात शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर आठ हजार २२९ खड्डे पडले होते. उपनगरांतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले होते. आतापर्यंत डांबर, कोल्डमिक्सने दोन हजार ७४९, बीबीएम म्हणजे खडीने १ हजार २३३, डब्ल्यूएमएमने दोन हजार ७३८ खड्डे, पेव्हिंग ब्लॉक बसवून ४०७ खड्डे भरण्यात आले. मुरूम, खडी आणि सिमेंट काँक्रिटने ६८५ असे सात हजार ८१२ खड्डे बुजविले असून, शहरात फक्त ४१७ खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, महापालिकेचा हा दावा फोल असून शहराच्या अनेक भागातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे दिसून येतात.

आणखी वाचा-बसची आसन क्षमता ४० आणि वाहतूक तब्बल ८० प्रवाशांची; आरटीओच्या वायुवेग पथकाची खासगी बसवर कारवाई

प्रभाग एकूण खड्डे बुजविलेले खड्डे बाकी खड्डे
५८३ ५४९ ३४
१,४९४ १,४३०६४
१,१३९ १०८८५१
१,५५५१,४४६१०९
३८२ ३६६ १६
८०६ ७८२ २४
५७८ ५४८ ३०
६७६ ६४७ २९

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तत्काळ बुजविले जातात. आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे सर्व खड्डे डांबराने बुजविण्यात येणार असून यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ३० नोव्हेंबरची मुदत दिली आहे. -मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका