पिंपरी- चिंचवड : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी मित्राच फिल्मी स्टाईल स्वागत करणं मित्रांना चांगलंच महागात पडलं आहे. आरोपीसह मित्रांना पोलिसांची हात जोडून माफी मागावी लागली आहे. श्याम यत्नाळकर हा हत्येच्या गुन्ह्यातून सात वर्षांनी कारागृहातून सुटला होता. त्याचं स्वागत त्याच्या मित्रांनी फटाके फोडून केले. याची कुणकुण निगडी पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाच ते सहा जणांना ताब्यात घेऊन हात जोडून माफी मागायला लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हेगारी कृत्याला प्रोत्साहन देणाऱ्या कृतीला निगडी पोलिसांनी ठेचून काढलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. श्याम यत्नाळकरने अनैतिक संबंधातून एकाची हत्या केली होती. हा गुन्हा साताऱ्यातील वाई पोलीस ठाण्यात दाखल होता. या गुन्ह्यात कळंबा कारागृहात श्याम हा शिक्षा भोगत होता. दोन- तीन दिवसांपूर्वी सात वर्षानंतर श्यामची सुटका झाली आणि तो पुन्हा एकदा पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

पिंपरी- चिंचवडमध्ये राहत असलेल्या ठिकाणी श्यामचे चार चाकीतून आगमन झाले. जल्लोषात फटाक्याची आतषबाजी करून फिल्मी स्टाईल स्वागत करण्यात आलं. हेच स्वागत त्याच्यासह मित्रांच्या अंगलट आलं. त्याला पुन्हा निगडी पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पाचही जणांना निगडी पोलिसांनी चांगलीच समज दिली आणि सोडून दिलं.