पुणे : जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.अक्षय हनुमंत रावडे (वय २६, रा. रायकरनगर, वडगाव धायरी) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षयचा भाऊ किरण (वय २७) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय रिक्षा चालक आहे.
मध्यरात्री अक्षयची स्वारगेट परिसरात तिघांशी वाद झाला होता. त्यानंतर अक्षयला तिघे जण जनता वसाहत परिसरात घेऊन गेले. कॅनोल रस्त्यावर अक्षयवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कॅनोल रस्त्यावरील झुडुपामध्ये शनिवारी सकाळी अक्षय मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.अक्षयच्या खून प्रकरणात एका रिक्षाचालकासह तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट परिसरात मध्यरात्री अक्षयची तिघांशी वादावादी झाली होती. अक्षय आणि आरोपी दारु प्याले होते, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील तपास करत आहेत.