कर्वे रस्त्यावर सराईत गुन्हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गुन्हेगाराचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुण्यातील भाषणात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, कुत्र्यांच्या नसबंदीवरून भाजपावर टीकास्र; म्हणाले, “यांची अक्कल कुठं…”

नंदू जाधव (वय २२) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. या प्रकरणी हल्लेखोरांच्या विरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाधव याच्याविरुद्ध वारजे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई केली होती. मोक्का कारवाई झाल्यानंतर त्याने न्यायालयाकडून जामीन मिळवला होता. जामीन मिळवल्यांतर तो नुकताच कारागृहातून बाहेर आला होता.

हेही वाचा >>>Video: “अजितदादा म्हणजे कमाल की चीज, नेता असाच…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला!

गुरुवारी (२३ फेब्रुवारी) रात्री अकराच्या सुमारास तो कर्वे रस्त्यावरील पीएनजी ज्वेलर्ससमोरुन निघाला होता. हल्लेखोर त्याच्या मागावर होते. रस्ता ओलांडणाऱ्या जाधववर चौघा जणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. जाधव याचा खून करणारे हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पाेलिसांनी पथके तयार केली आहेत. जाधव याचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a criminal in an inn where mokka was installed on karve road pune print news rbk 25 amy