पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याची घटना हडपसर भागातील शंकरमठ वसाहतीत  घडली. याप्रकरणी तीनजणांसह अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे (वय १७, रा. शंकरमठ परिसर, मिरेकर वस्ती, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सनी रावसाहेब कांबळे (वय २५), अमन साजिद शेख (वय २२), आकाश हनुमंत कांबळे यांच्यासह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील आणि आरोपी सनी कांबळे यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. आरोपींनी रविवारी (१७ सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास स्वप्नीलला घराबाहेर बोलावले. सार्वजनिक शौचालयाजवळ त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी कांबळे, शेख आणी साथीदारांनी कोयते उगारुन दहशत माजविली. आमच्या नादाला लागला तर जीवे मारू, अशी धमकी देऊन दहशत माजविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.