भिडे पुलाजवळ तरुणावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. खुनामागचे कारण समजू शकले नाही. गणेश सुरेश कदम (रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

हेही वाचा- पुण्यातील भवानी पेठेत पोलिसांनी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

उपचारापूर्वीच मृत्यू

. बाबा भिडे पुलाजवळ मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कदम गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कदम याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा- एटीएम केंद्रातील रोकड चोरीचा प्रयत्न; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय

कदम शनिवार पेठेत राहायला असल्याने परिसरातील नागिरकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. कदम याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या हल्लेखाेरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. कदमचा भाऊ ओम याचा काही वर्षांपूर्वी शनिवार पेठेत खून झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader