राजकीय वैमनस्यातून पुण्यातील पाषाण भागामध्ये शुक्रवारी रात्री एका तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. प्रतिक रामचंद्र निम्हण (वय २३, रा. काळे इलाईट, पाषण) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मित्रांनाही मारहाण करण्यात आलीये. या प्रकरणी चेतन निम्हण, तुषार निम्हण, मुन्ना संभाजी निम्हण, सागर निम्हण, राहुल गुंड, रवी शिर्के, अभिजीत घाटगे यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्रतिक आपल्या मित्रांसोबत आपल्या घराखाली बोलत उभा राहिला होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सर्व आरोपी मोटारसायकलवरून तिथे आले. त्यांनी प्रतिकला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींपैकी एकाने आपल्याकडील रिव्हॉल्वर काढल्यावर प्रतिक घराकडे पळाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग केला. प्रतिक घरामध्ये गेल्यावर त्याच्यावर रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. रिव्हॉल्वरमधून एकूण तीन राऊंड झाडण्यात आले. प्रतिकच्या मित्रांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. कीर्ती रामदास काळे (रा. काळे इलाईट्स, पाषाण) यांनी या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a youth in pune due to political rivalry
Show comments