पुणे : लोहियानगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खून झालेल्या तरुणाचे वय ३५ ते ४० वर्ष दरम्यान असून, त्याची ओळख पटलेली नाही. नेहरु रस्त्यावरील महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयासमोर जुने गाळे आहेत. या गाळ्यांचा वापर कोणी करत नाहीत. महापालिकेकडून हे गाळे बांधण्यात आले आहेत. गाळ्यांच्या आवारात कचरा तसेच टाकाऊ वस्तू टाकण्यात आल्या आहेत. तेथील मोकळ्या जागेत जुना सोफा ठेवण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोफ्यावर एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. तरुणाचा गळ्यावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्याचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. तरुणाने लाल रंगाचा टीशर्ट आणि जीन परिधान केली आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलीस निरीक्षक संपतराव राऊत तपास करत आहेत.