लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: दारु पिताना झालेल्या वादातून दोघा मित्रांनी पीएमपी चालकाचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे.
आणखी वाचा-पुणे: चोरी, घरफोडी, लुटमारीच्या ५३ गुन्ह्यांतील फरारी चोरटा अखेर जेरबंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिवेकर आणि आरोपी दारू पित होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. दोघांनी त्यांचा खून केला. रात्रभर पती घरी न आल्याचे पाहून त्यांची पत्नीने शोध घेतला. दिवेकर यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.