पुणे : कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मोहोळ याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शरद मोहोळ याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे चारशे ते पाचशे जणांचा जमाव जमला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

कोथरुड भागात दहशत असलेला शरद मोहोळवर दुपारी सुतारदरा परिसरात हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत मोहोळ गंभीर जखमी झाला. हल्लेखोर तेथून पसार झाले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : वसई, भाईंदर मध्ये २०२३ मध्ये एकूण ३७ हत्या; नालासोपारा येथील महिलेच्या हत्येचे गूढ कायम

या घटनेची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्याच्या साथीदारांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.