पिंपरी: घरगुती वादातून वडिलांनी मुलाचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची घटना मावळमधील सदुंबरे गावात घडली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. समीर बाळू बोरकर (वय ३४, रा. बोरकरवस्ती, सुदुंबरे, मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील बाळू बबन बोरकर (वय-५५) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा >>> पुणे: कोलवडीत छटपूजेत हाणामारी; सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
हेही वाचा >>> पुणे : भरधाव बसच्या धडकेने पादचारी मृत्युमुखी; नगर रस्त्यावर अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळातील सुदुंबरे गावात राहणाऱ्या बोरकर पिता-पुत्रात घरगुती स्वरूपाचे वाद होते. १ नोव्हेंबरला दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्याचे पर्यावसन वडिलांनी लाकडे फोडण्याच्या कुऱ्हाडीने समीरच्या डोक्यात घाव घालून त्याचा खून केला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडे पुढील तपास करत आहेत.