लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याप्रकरणी तरुणाच्या आईसह प्रियकराला अटक करण्यात आली.

Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Nagpur murder, Murder of a youth, revenge ,
उपराजधानीत तीन दिवसांत तिसरे हत्याकांड; मित्राच्या खुनाचा बदला घेत युवकाचा खून
Two murders in one night in the sub-capital Nagpur
गृहमंत्र्यांच्या शहरात गँगवार! दोन हत्याकांडांनी नागपूर हादरले; बिट्स गँगच्या…
Businessman resident of Gujarat kidnapped from Malkapur in Vidarbha
व्यापारी गुजरातचा, अपहरण मलकापुरातून अन् आरोपी मराठवाड्यातील!

अनिल लालसिंग ठाकूर (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हिला अटक करण्यात आली. याप्रकरणी सुमित्राचा प्रियकर प्र्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३४, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथोड पसार झाला आहे. अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय ३२) याने याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमित्रा आणि तिची मुले अनिल, सुनील मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते मजूरी करतात. पेरणे फाटा परिसरातील वाघमारे वस्ती भागात ते राहायला आहेत. या भागात राहणाऱ्या आरोपी प्रफुल्लशी सुमित्राचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाची कुणकुण अनिलला लागल्याने त्याची आई सुमित्राशी भांडण झाले होते.

आणखी वाचा-जन्म-मृत्यू दाखले विलंबाबाबत पुणे महापालिकेने दिली महत्वाची माहिती!

बुधवारी मध्यरात्री सुमित्रा, तिचा प्रियकर प्रफुल्ल यांच्याशी अनिलचा वाद झाला. त्यावेळी प्रफुल्ल आणि सुमित्रा यांनी अनिलला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमित्राला अटक करण्यात आली असून, आरोपी प्रफुल्ल पसार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

आणखी वाचा-पिंपरीतील ‘त्या’ प्रकरणात प्रेयसीचाही मृत्यू; लॉजमध्ये प्रियकर आणि प्रेयसी…

अनैतिक संबंधातून तिसरा खून

शहरात महिनाभरात अनैतिक संबंधातून तीन खून झाले आहेत. कर्वेनगर भागात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने प्रियकराशी संगनमत करुन त्याचा खून केला होता. महिलेने पतीला जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. झोपेत असलेल्या पतीवर प्रियकराने तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. कात्रज भागात अनैतिक संबंधातून महिलेने प्रियकराशी संगनमत करुन पतीचा खून केला होता. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव त्यांनी रचला होता. तपासात पतीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. महिलेसह प्रियकारला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यानंतर लोणीकंद भागातील पेरणे फाटा परिसरात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा आई आणि तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

Story img Loader