लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मोटारचालक पती परगावी गेल्यानंतर घरात एकट्या असलेल्या तरुणीचा खून करुन मृतदेह पलंगाच्या कप्यात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली. महिलेच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

dr sulakshana shilwant dhar
“तीच्यावर पक्षाचा फार जीव”, शिलवंत यांचं तिकीट कसं कापलं? अजित पवारांनी सगळं सांगितलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. अष्टविनायक कॉलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्नाली यांचा खून करुन मृतदेह पलंगाच्या कप्यात ठेवल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना शुक्रवारी मध्यरात्री मिळाली. स्वप्नाली यांचे पती उमेश मोटारचालक आहेत. ते शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास बीडला प्रवासी घेऊन गेले होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात दिसली नाही. त्यांनी पत्नीचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही.

आणखी वाचा-स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

घरातील दागिने, रोकड, पत्नीचा मोबाइल शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दागिने, रोकड पलंगात ठेवली का?, हे पाहण्यासाठी त्यांनी पलंग उघडला. तेव्हा पत्नीचा मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर रात्रपाळीत गस्त घालणारे सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक खंदारे, विनोद पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्याा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी घटनास्थळी अंगुली मुद्रा तज्ज्ञ, तसेच श्वान पथकाला पाचारण केले. स्वप्नाली यांच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.