पुणे: पुण्यातील कोंढवा भागात एक धक्कादायक घटना घडली असून, दोन चिमुकल्यांसह तिच्या आईचा चुलत दिराने खून करून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयातून चुलत दिराने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

आम्रपाली वाघमारे (वय ३०) रोशनी (वय ६) आणि  आदित्य अशी खून झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिराला ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला आहे.

criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला
person murder construction worker,
पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Police arrested three men for killing young man on Tuljaram College Road Baramati
बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड

आणखी वाचा- पुणे: चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामाला वेग, ‘गर्डर’ टाकण्याचे काम पुढील आठवड्यात

चुलत दीर व आम्रपाली यांच्यात प्रेम संबंध  होते. ते वर्षभरापूर्वी पुण्यात रहायला आले होते. आम्रपाली यांचा विवाह झालेला होता; पण प्रेमातून त्या चुलत दिरासोबत येथे पळून आलेल्या होत्या. कोंढवा येथील पिसोळी भागात ते राहत होते. दोन मुले, आम्रपाली आणि चुलत दीर असे राहत असताना चुलत दिराला तिचे दुसऱ्याशी संबंध आहेत, असा संशय होता. त्यावरून ही घटना घडली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने प्रथम आम्रपाली यांना ठार मारले. त्यानंतर मूल रडत असल्याने त्यांनाही मारले. त्यानंतर या तिघांना जाळले. हा प्रकार समोर येताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पसार झालेल्या दीर याचा शोध घेऊन पकडले. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Story img Loader