लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अनैतिक संबंधांतून शुक्रवारी मध्यरात्री कर्वेनगरमध्ये एकावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून एकाला अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Baba Siddique murder Accused Arrested
Baba Siddique Murder : मुंबई पोलिसांची दंगल उसळलेल्या जिल्ह्यात २५ दिवस शोधमोहिम; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२, रा. कर्वेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसन्न साहेबराव कोकरे ( वय २७, रा. आनंद विहार, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. निवंगुणे यांच्या पत्नीशी कोकरे याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या कारणावरुन त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. निवंगुणे यांनी कोकरेला मारहाण केली होती. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने कोकरेने निवंगुणे यांचा काटा काढण्यासाठी कट रचला.

आणखी वाचा-सिंहगडाजवळ सांबारेवाडीतील हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

कोकरे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास निवंगुणेच्या घराजवळ बुरखा घालून गेला. त्याने दरवाजा वाजवला. निवंगुणे जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर कोकरे याने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. आवाजाने त्यांची पत्नी आणि तीन मुली झोपेतून जाग्या झाल्या. त्या धावत दारात पोचल्या. त्यांच्यासमोरच कोकरे याने निवंगुणे यांच्यावर कोयत्याने वार केले. आवाज ऐकून रहिवाशांनी तेथे धाव घेतली. बुरखा घातलेला कोकरे तेथून पसार झाला.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निवंगुणे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच निवंगुणे मरण पावले. या घटनेनंतर वारजे पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

डोळ्यादेखत वडिलांचा खून; मुलींना मानसिक धक्का

डोळ्यादेखत वडिलांचा निर्घृण खून झाल्याने निवंगुणे यांच्या तीन मुलींना मानसिक धक्का बसला आहे. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये आणि पथकाने तपास करून आरोपी कोकरे याला अटक केली. निवंगुणे खून प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.