लोणावळा : कामशेत रेल्वे स्थानकाच्या आवारात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
विजय सतू भोंडवे (वय २२, रा. भाजेगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष महादेव घाटे याला अटक करण्यात आली आहे. कामशेत रेल्वे स्थानकाच्या आवारात फलाटावर भोंडवे थांबला होता. त्या वेळी आरोपी घाटे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन ते तीन साथीदारांनी भोंडवेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या भोंडवेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने तपास करून मारेकऱ्यांना पकडण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक फौजदार अब्दुल शेख, समीर शेख, गणेश तावरे, सुहास सातपुते, डोईफोडे, सुधीर घारे आदींनी तपास सुरू केला. आरोपी संतोष घाटे याला पकडण्यात आले. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाकडून गुन्हा दाखल करण्यात आला.