बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा दोरीने गळा आवून खून केल्याचे उघडकीस आले आहे. खून केल्यानंतर तरुणाचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला. तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

कोंढवा परिसरातील बोपदेव घाटातील वळणावर सेल्फी पाॅईंटजवळ एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ३५ वर्ष असून नायलाॅनच्या दोरीने गळा आवळण्यात आला असल्याचे कोंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले.

तरुणाच्या डोक्यावर शस्त्राने वार करण्यात आले आहे. त्याची ओळख पटलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक मोगले तपास करत आहेत.

Story img Loader