उस्ताद उस्मान खाँ यांची भावना
भारतीय अभिजात संगीत कलेची निरपेक्ष आणि निरलस भावनेने सेवा करण्याचे काम डॉ. नानासाहेब देशपांडे आणि पं. श्रीकांत देशपांडे यांनी केले. देशपांडे कुटुंबीयांच्या या सेवेने संगीत कला समृद्ध झाली आहे, असे मत ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांनी व्यक्त केले.
किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. श्रीकांत देशपांडे यांचा जन्मदिन आणि डॉ. नानासाहेब देशपांडे जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून श्रीकांत देशपांडे मित्रमंडळातर्फे आयोजित संगीत संध्या कार्यक्रमात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन झाले. उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते प्रसिद्ध गायिका डॉ. रेवती कामत यांना नानासाहेब देशपांडे आणि प्रमिला देशपांडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ गायक पं. नाथराव नेरळकर, सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाचे विश्वस्त मििलद देशपांडे, अनंत देशपांडे आणि श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे या वेळी उपस्थित होत्या.
नानासाहेबांमुळेच मला सवाई गंधर्व महोत्सवात कला सादरीकरणाची संधी मिळाली होती. त्यांनी आपल्या सांगीतिक कलेबरोबरच वैद्यकीय सेवेनेही कलाकार आणि संगीत रसिकांची कायम काळजी घेतली, असे सांगून उस्ताद उस्मान खाँ म्हणाले, श्रीकांत देशपांडे यांच्याशी माझी चार दशकांची मैत्री होती. त्यांच्या विनोदी स्वभावाने कलाकारांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम केले. रेवती कामत यांच्या सांगीतिक जीवनामध्ये हा पुरस्कार महत्त्वाचा ठरेल.
माझे गुरु, कुटुंबीय आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा पुरस्कार मिळाला असून त्यामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असल्याची भावना रेवती कामत यांनी व्यक्त केली.
अनंत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा