पुण्यातील खराडी भागात दफनभूमी उभारली जावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होतं आहे. त्याचमुळे मुस्लिम बांधवांनी मृतदेह महापालिकेच्या आवारात आणून आंदोलन केले. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खराडी भागात दफनभूमी झालीच पाहिजे अशी मागणी पठारे यांनी यावेळी केली. . या मागणीसाठी तीन वर्षांसून पत्रव्यवहार करून देखील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महापालिकेत बेवारस मृतदेह आणावा लागला आहे. या प्रश्नावर लवकरच दफ भूमिचा प्रश्न मार्गी लावू असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले आहे. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.