पिंपरी : भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे पैसे सापडल्याचा आणि त्यांना अटक केल्याचा खोटा बनाव भाजपकडून केला जात आहेत. भाजपचेच कार्यकर्ते पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप करत असून पोलीस, निवडणूक विभाग आणि जिल्हाधिका-यांकडे तक्रार करूनही कारवाई हाेत नसल्याचा आराेप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तक्रारीची पाेलिसांनी दखल न घेतल्यास भाेसरी पाेलीस ठाण्यासमाेर ठिय्या आंदाेलन करण्याचा इशाराही दिला आहे.
उमेदवार अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होते. भोसरी मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक खोटे कथानक तयार केले जात आहे. शनिवारी रात्री मतदारसंघातील गव्हाणे वस्ती भागामध्ये दोन कोटी रुपये सापडले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची खोटी माहिती समाजमाध्यमावर पसरवण्यात आली. असा काही प्रकार घडलेला नसताना जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवली जात आहे. दिघी पोलीस ठाण्यामधील पोलीस भाजपला सहकार्य करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.
हेही वाचा >>>काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा
लांडे म्हणाले, की जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यातून कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. संभ्रम निर्माण केला जात आहे. खोटी माहिती मतदारसंघात पसरवली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, निवडणूक विभाग अशा सगळ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र पाेलीस सहकार्य करत नाहीत. तर, भाजप पदाधिकाऱ्यांसाठी पोलीस यंत्रणा राबवली जात आहे. “वरून आदेश आले आहेत” असे काही पोलीस अधिकारी खासगीत सांगतात. साम-दाम-दंड-भेद असे सगळे प्रकार वापरून भोसरी विधानसभेमध्ये पैसे वाटपाचा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप उबाळे यांनी केला.
हेही वाचा >>>Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
चिंचवडमध्ये भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष?
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराकडून पिंपळेगुरव परिसरातील मतदारांना पैसा व इतर विविध स्वरूपाचे आमिष दाखवण्यात येत आहे. तसेच, त्यांचे मतदान ओळखपत्र जप्त करून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला आहे.
महायुतीच्या बाजूने चांगले वातावरण आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. पैशांचे वाटप होत नाही. आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे आव्हान भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिले.