पुणे : शहरातील एका महाविद्यालयाच्या आवारात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात संस्थाचालक, विश्वस्तांना वेळकाढूनपणाची भूमिका घेतली. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाचे विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली. पोलीस आयुक्तयालयासमोर महाविकास आघाडीकडून शुक्रवारी धरणे आंदाेलन करणअयात आले.
हेही वाचा >>> कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला दिल्लीतील शिक्षण संस्थेने प्रवेश नाकारला
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रशांत जगताप यांच्यासह रिपब्लिकन विद्यार्थी सेना, दलित पँथर ऑफ इंडिया, विद्यार्थी विकास मंच संघटना आंंदोलनात ससहभागी झाले होते. शहरातील एका महाविद्यालयात अल्पयवयीन युवतीवर चौघांनी अत्याचार केले. आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते. संबंधित महाविद्यालयाचे विश्वस्त सचिन सानप यांना या घटनेची माहिती होती. त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडित युवतीच्या वडिलांवर दबाव टाकला. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सानप मंत्रीमंडळातील एका मंत्र्याच्या निकटवर्तीय आहेत. दबावापोटी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कारवाई केली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आली. पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलकांनी घोषणबाजी केली. ‘अल्पवयीन मुलीला न्याय द्या, महाविद्यालयाच्या विश्वस्तांना आरोपी करा, त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करा’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा >>> पुणे : चोरट्यांचा आंबा बर्फीवर ताव; मिठाई विक्री दुकानातून रोकड, अडीच किलो आंबा बर्फी चोरीस
अमली पदार्थाचे सेवन करून आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. हे सर्व संस्थाचालकाला माहिती असूनही त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणातील पोलिसांनी तपासात त्रुटी न ठेवता, मुलीला न्याय द्यावा. संबंधित संस्थेत काही जण चुकीचे काम करीत आहेत. विश्वस्तांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी. युवतीला जर न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करु. – रवींद्र धंगेकर, आमदार
महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण गंभीर आहे. महाविद्यालयीन प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले पाहिजे. – संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे