‘एका बाळाची आई असणे म्हणजे पूर्ण वेळ काम आहे. माझ्या १७ महिन्यांच्या बाळालाच माझ्या आयुष्यात प्राधान्य असून त्यामुळे येत्या दीड-दोन वर्षांत तरी मी चित्रपटांमधून दिसणार नाही,’ असे अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सांगितले.
रांका ज्वेलर्सच्या सातारा रस्ता येथील दालनाचे शिल्पा हिच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ती बोलत होती. रांका ज्वेलर्सचे हे राज्यातील आठवे दालन आहे. पुखराज रांका, फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका आदि या वेळी उपस्थित होते.
शिल्पा म्हणाली, ‘‘मला खूप दागिने घालायला आवडत नाहीत. पण अंगठी, कर्णफुले आणि माझे ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’ हे दागिने नेहमी घालते. सोन्याचे दागिने खरेदी केले, तरी मी गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करत नाही. सोने मोडायची कधी वेळही आली नाही. सध्या मी चित्रपट करत नसून टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये मला आनंद मिळतो आहे. मात्र चित्रपट निर्मितीचे काम सुरू आहे.’’ आगामी काळात ‘फिटनेस’विषयी लेखन करण्याची आपली इच्छा असल्याचे तिने सांगितले.

Story img Loader